Majha Gav Majha Shahr

शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

धरतरी ग्रुप व कैलास खुरकुटे यांचा शैक्षणिक मदतीचा उपक्रम

जव्हार प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत शिरोशी हद्दीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील बालकांना धरतरी ग्रुप व कैलास खुरकुटे यांच्या वतीने वह्या, पेन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही समाजात पोहोचतो.

या उपक्रमावेळी धरतरी ग्रुपचे सचिव संदीप पाटारा, सदस्य भारत पाटारा, शिरोशी ग्रामपंचायतीचे रोजगार सहाय्यक रमण खरपडे, ग्रामस्थ वनसू भोये, बाळा भोये, हेमंत भोये,दीपक सुरेश पवार तसेच शाळेतील विद्यार्थी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून, अशा सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

*शिक्षणाला साथ, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श!*

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें