Majha Gav Majha Shahr

न्यू तुळजा सोसायटी सेरेनिटी ग्रीन वासिंद पश्चिमआयोजीत नवरात्रौत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन.

शहापूर – ( सचिन शेलवले ) आज दिनांक 13/10/2024 रोजी न्यू तुळजा ग्रीन सेरेनिटी सोसायटी वासिंद पश्चिम येथे नवरात्रौत्सव निमित्त अनेक महिला व लहान, मोठ्या मुलांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले . पहिल्या दिवशी देवीच्या फोटोची प्रतिमा पूजन, प्रतिष्ठापना करण्यात आली . रात्रौ सर्व सदनिकाधारकांकडून नित्य नियमाने आरती केली जाते . सर्वांना आरतीचा मान दिला जातो . नियोजीत वेळेत सर्व सदनिका धारक सदस्य डिजेच्या तालावर गरबा नृत्यात सहभागी होतात . सर्वजण एकत्र येऊन आनंद उपभोगतात . आपला संस्कृतीची एकता जपतात . दुसऱ्या दिवशी महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . त्यात सर्व महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . तिसऱ्या दिवशी लहान व मोठ्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . मुलांनी आपल्या आवडीचे चित्र काढुन रंग भरले . सर्व मुलांकडुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . त्यानंतर नियमित देवीची आरती व त्यानंतर पून्हा मुलांचा चमचा लिंबुचा खेळ घेण्यात आला . त्यांनंतर रास दांडिया नृत्यामधे अनेक महिला, मुले, पुरुष सहभागी होऊन नृत्यांचा आनंद लुटत आहे . नवरात्रौत्सव चालू झाल्यापासुन सोसायटी मध्ये नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण भेदभाव विसरून एकत्र येऊन उत्सव साजरा करत आहे . दररोज प्रजापिता ब्रह्म कुमारी यांस कडून चैतन्य झाकी देवीची नऊ दिवस नऊ रुपात सभामंडपात दुर्गामातेच्या प्रतिमेच्या बाजुला बसविली जाते . व प्रत्येक दिवशी घेतलेल्या नऊ रुपाचे, उपासनेचे महत्व दररोज एकतास सांगितले जाते . दररोज मंडळाच्या नियोजना प्रमाणे कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडत आहेत . या सोसायटी मध्ये सर्व कार्यकम वेळेत चालू होऊन वेळेत पार पडतात .सर्व सदनिकांचे मंडळाकडून खुप खुप आभार असेच दरवर्षी एकत्र येऊन कोणतेही उत्सव आनंदाने साजरे होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना, सर्वांचे खुप खुप धन्यवाद!

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें