न्यू तुळजा ग्रीन सेरेनिटी नवदुर्गा मित्र मंडळ आयोजीत महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम

वासिंद – (सचिन शेलवले ) शुक्रवार दिनांक 16/10/2026 रोजी न्यू तुळजा सेरेनिटी ग्रीन मधील सर्व सोसायटी मधील सर्व महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम नवरात्रौत्सवा निमित्त ठिक संध्याकाळी 6.30 वाजता साजरा करण्यात आला . यामध्ये सोसायटी मधील सर्व महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपत हा उत्सव साजरा झाला . प्रत्येक महिलेला हळदीकुंकू करून हळदी कुंकवाचे एकपान व वाळिंबे मॅडम यांजकडुन 300 नग चाफ्यांची महिलांना देण्यात आले . महिलांनी एकत्र येण्यामुळे संवाद वाढतो . सामाजिक बंध घट्ट होतात . आदिशक्ती (स्त्री शक्तीचे ) रूप मानले जाते .सर्व महिलांनी एकत्र येऊन हळदी कुंकू हा कार्यक्रम यशस्वी केला . मंडळाकडून त्यांना खुप खुप धन्यवाद . दरवर्षी हा सण आपल्या सोसायटीत साजरा व्हावा अशी देवीला प्रार्थना करतो . देवी माते सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य लाभो आणि सर्वांची मनोकामना देवीच्या रुपाने पूर्ण व्हावी हिच सदिच्छा!









