श्री स्वामी सेवा रुग्णालय यांच्यातर्फे न्यू तुळजा ग्रीन सेरेनिटी सोसायटी वासिंद पश्चिम येथे नवरात्रौ निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

वासिंद – (सचिन शेलवले )l
रविवार दिनांक 18/10/2026 रोजी श्री स्वामी सेवा रुग्णालय यांच्या तर्फे न्यू तुळजा ग्रीन सेरेनिटी सोसायटी वासिंद पश्चिम येथे नवरात्री निमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले . रुग्ण सेवा, हिच स्वामी सेवा या प्रमाणे आरोग्य शिबिरासाठी तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्वांसाठी मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली होती . यामध्ये रक्तदाब तपासणी (BP), उंची व वजन तपासणी, महिलांचे आरोग्य तपासणी व सल्ला, आरोग्य विषयक माहिती व समुपदेशन, आहार विषयक मार्गदर्शन, संपूर्ण आरोग्य तपासणी या प्रकारच्या चाचण्या डॉक्टरांकडुन न्यू तुळजा ग्रीन सेनेरिटी सोसायटीच्या सदस्यांसाठी मोफत होत्या . या शिबिरामध्ये सोसायटी मधील सर्व सदस्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . आपले आरोग्य हिच आमची प्राथमिकता याप्रमाणे मंडळाने केलेल्या सहकार्यामुळे व नियोजनामुळे सोसायटी मधील सर्व नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . त्याचा फायदा सर्व नागरीकांना झाला .









