
श्री गणेश विद्यामंदिर येथे प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न
दिवा – ( सचिन शेलवले ) दिनांक 26/01/2025 रोजी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित श्री गणेश विद्यामंदिर लिलावती कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व माय मदर इंग्लिश स्कूल या शाळेत रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला.
सकाळी सात वाजता सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीमती लिलावती म्हात्रे, सचिव श्री साईनाथ म्हात्रे संचालिका सौ.केतकी म्हात्रे , सौ.गीता म्हात्रे, संचालक श्री. दिनेश म्हात्रे, मुख्याध्यापक श्री. श्रीराम चौधरी , श्री .अनिल भोईर यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संगीताच्या तालावर ध्वजगीत, राष्ट्रगीत , राज्यगीत विद्यार्थ्यांनी सादर केले.
विद्यार्थ्यांनी भाषणे, कवायत प्रकार, लेझीमचे प्रात्यक्षिक अतिशय उत्तम प्रकारे सादर केले. विद्यार्थ्यांनी संगीताच्या सुरेल साथीने देशभक्तीपर गीते गायले.
याप्रसंगी सचिव श्री. साईनाथ म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपली शाळा संपूर्ण डिजिटल होत असून शिक्षकांनी आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा विद्यार्थ्यांना फायदा करून शाळेचा नाव लौकिक वाढवावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग ,ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






