Majha Gav Majha Shahr

मोखाड्याचा युवराज कामडी याची वनरक्षक पदी निवड…


मोखाडा ग्रामीण/ सचिन वझरे –

पालघर जिल्यातील मोखाड्याचा ब्राम्हणगाव येथील युवराज कामडी या तरुणाने अत्यंत कडखर परिस्तीतीतुन शिक्षण घेऊन जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर जव्हार विभागात आपली निवड सार्थ ठरवली. युवराज कामडी हा एकत्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय – जव्हार अंतर्गत उच्च माध्यमिक आश्रम शाळा गोंदे येथे शिक्षण घेत असतानाच चपळ आणि काटक असल्याने त्याने अनेक क्रीडा प्रकारात प्रभाव पाडला होता. लहान वयातच त्याचे मातृत्व हरपले असेल तरी तो डगमगला नाही त्याने मोल मजुरी करून मोखाडा येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिवाय शिक्षण घेत असताना कंपनी अथवा बिगारी काम करून तो कौटुंबिक जबाबदारी पार पाडत होता. युवराज कामडी याची वनरक्षक पदी निवड ग्रामीण भागातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणदायी ठरणार आहे. आज त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण झालेले असून त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता. असं त्याने माझं गाव माझं शहर सोबत बोलतांना सांगितल.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें