Majha Gav Majha Shahr

इंडुरन्स नॅशनल चॅम्पियनशिप पालघर जिल्ह्याच्या दक्षतनया गाडरने पटकावले दोन ब्रॉन्झ मेडल्स.


मोखाडा ;सचिन वझरे

मोखाडा – इंडूरन्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित खोपोली येथे 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी दिवसा आणि रात्री प्रकाशझोतात स्पेशल स्केटिंग रिंकवर इंडुरन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024-25 संपन्न झाली. या स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये स्पीड क्वाड, स्पीड इनलाईन, रिकेशनल स्केटर्स महाराष्ट्र, गोवा,गुजरात,तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश इ.राज्यांमधून दिव्यांग स्केटर्ससह जवळपास 800 च्यावर स्केटर्स सहभागी झाले होते.
या चॅम्पियनशीपमध्ये पालघर जिल्ह्यातील कु. दक्षतनया रामदास गाडर हिने 5 मिनिटे आणि दोन मिनिटांच्या रेसमध्ये 14 वर्षे वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना दोन ब्रॉन्झ मेडल्स पटकावले आहेत. पुढे ती फिलिपाईन्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तराकरिता भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. दक्षतनया ही मुळची मोखाडा तालुक्यातील घानवळ या अतिशय दुर्गम – आदिवासी गावातील असून ती सातत्याने स्केटिंगच्या स्पर्धेत मेडल्स पटकावत आहे.
दक्षतनयाच्या स्केटिंग स्पर्धेतील उल्लेखनीय कमागिरीमुळे तिने मोखाडा तालुक्याबरोबरच पालघर जिल्ह्याचे राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उंचावलेले असल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें