Majha Gav Majha Shahr

मोरेश्वर घागस यांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार….

मोरेश्वर घागस यांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार

palghr mgmsnews. अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ या

संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचलित मासवण विभाग हायस्कुल पालघरचे कलाशिक्षक मोरेश्वर रघुनाथ घागस यांना देण्यात आला. अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे पार पडले. कलाक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन घागस यांना गौरवण्यात आले. त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे व्यासपीठावर पंढरपूर ड्रॉइंग कॉलेज चे अध्यक्ष भारत माळी उपस्थित होते. तसेच विविध पदाधिकारी सदस्य व कलाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें