Majha Gav Majha Shahr

युवाशक्तीचा विजय! मान गावातील ‘अमर जवान’ गल्लीतील वीज समस्या सुटली; तरुणांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ

पालघर (मान): युथ पॉवर काय करू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मान गावातील ग्रामस्थांना आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विजेच्या खेळखंडोब्यामुळे त्रस्त असलेल्या ‘अमर जवान पेट्रोल पंप’ समोरील गल्लीतील समस्या, गावातील तरुणांच्या एकजुटीमुळे अवघ्या तीन दिवसांत मार्गी लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी पावसात या गल्लीतील थ्री-फेजची मुख्य वायर तुटली होती. त्यावेळी दुरुस्ती करताना ती जोडण्याऐवजी केवळ सिंगल फेजवर वीज पुरवठा सुरू ठेवण्यात आला. मात्र, या गल्लीत पिठाची गिरणी आणि इंजिनिअरिंग वर्क्स सारखे अवजड लोड असलेले वर्कशॉप्स असल्याने सिंगल फेजवर प्रचंड ताण येत होता. यामुळे दर दोन दिवसांनी फ्यूज उडत असे आणि नागरिकांना सलग १० ते १२ तास वीजेविना राहावे लागत होते.

वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे मान गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी वैयक्तिक तक्रारी सोडून सामूहिक शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. सर्व युवा एकत्रितपणे वीज वितरण कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आक्रमकपणे तक्रार नोंदवली. यावेळी तरुणांनी ठणकावून सांगितले की,

“जब-जब युवा बोलता है, तब-तब सिंहासन डोलता है।”

अखेर जुनी वायर जोडली अन् प्रश्न सुटला तरुणांच्या या पवित्र्यामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली. जे काम कित्येक महिने प्रलंबित होते, ते तक्रार केल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांत पूर्ण झाले. प्रशासनाने ती तुटलेली जुनी वायर पुन्हा व्यवस्थित जोडून (re-join) थ्री-फेज पुरवठा पूर्ववत केला.
आता या भागातील वीज पुरवठा स्थिर झाला असून वर्कशॉप्स आणि गिरण्या पुन्हा जोमाने सुरू झाल्या आहेत. “प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी तरुणांनी संघटित होणे किती गरजेचे आहे, हे या घटनेतून सिद्ध झाले,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी युवकांचे कौतुक केले आहे

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें