Majha Gav Majha Shahr

प्रथम फाउंडेशन तर्फे जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न..

प्रतिनिधी दिपक भोये  विक्रमगड माझं गावं माझं शहर वृत्तसेवा

विक्रमगड तालुक्यात 30/04/2026रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि P & G यांच्या संयुक्त विद्यमानाने हमारा गाव उपक्रम या अंतर्गत चालणाऱ्या गावा गावांमध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग, अंगणवाडी ताई, गावातील युवक ,SMC अध्यक्ष आणि माता पालक वर्ग यांच्या सहकार्याने गावांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आले यावर्षी पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन शारीरिक, बौध्दिक, सामाजिक, भावनिक, भाषा विकास, गणितीय, आणि मार्गदर्शन अशा स्टॉल ची मांडणी करण्यातआली होती. पुढे त्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे मुलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होताना दिसून आली मुलांचा

सहभाग चांगला दिसून आला मुले ऍक्टिव्हिटी मध्ये आनंदाने सहभागी होत होती, शेवटी शिक्षक वर्ग यांनी मुलांच्या मातांना पहिल्या मेळाव्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच माता पालकवर्ग शिक्षक वर्ग, अंगणवाडी ताई ,

प्रथम प्रतिनिधी या सर्वांचे सहकार्याने शाळा पूर्व तयारी कार्यक्रम हा एक आनंदाने, जोशाने पार पाडण्यात आला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें