Majha Gav Majha Shahr

मनोर–वाडा —भिवंडी महामार्गाची खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या कडून पाहणी; 

अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचन   

पालघर प्रतिनिधी माझं गावं माझं शहर वृत्तसेवा.सचिन वझरे

दि. 4 मे पालघर

पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली मनोर–वाडा तसेच वाडा–भिवंडी महामार्गाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. दौऱ्याची सुरुवात कंचाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन झाली. या बैठकीला पीडब्ल्यूडी तसेच ईगल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर खासदारांनी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषतः सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांना भेडसावणाऱ्या अडचणी, अपघातांची वाढती संख्या आणि अपूर्ण कामांबाबत प्रश्न उपस्थित करून उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.यानंतर खासदारांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन पाहणी केली.

यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या असून त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पाली येथील पुलाचीही पाहणी करण्यात आली.

पावसाळा जवळ येत असल्याने रस्त्यांची पूर्वतयारी करण्यावर खासदारांनी भर दिला. मनोर ते वाडा हा 23 किमीचा रस्ता असून त्यापैकी सुमारे 12 ते 13 किमीपर्यंत एक लेन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महामार्गावरील खड्डे तातडीने भरणे, अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ सुधारणा करणे आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय पावसाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन, जेसीबी यंत्रणा, खडीची उपलब्धता आणि इतर आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

“मे अखेरपर्यंत सुमारे 50 ते 60 टक्के काम पूर्ण होईल. नागरिकांनीही वाहन चालवताना विशेषतः ब्लॅक स्पॉट भागात काळजी घ्यावी,” असे आवाहन खासदारांनी यावेळी केले.

या पाहणी दौऱ्यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते मंडळी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें