१५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वाकी गावामध्ये वृक्षलागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी, विक्रमगड मा. महेश पांढरे साहेब उपस्थित होते. यावेळी सौ. वैभवी ठक्कर पाटील मॅडम यांच्या हस्ते ९०३३ ओव्यांचे हस्तलिखित व सुवाच्य लेखन असलेली ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अध्याय मा.महेश पांढरे साहेबांना भेट देण्यात आली. तसेच शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे शिक्षणप्रेमी गंगाराम महादू भडांगे विद्यालयामध्ये ज्ञानेश्वरी महावाचन आणि लेखन करून विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास मितवा फाऊंडेशन, मुंबईच्या संस्थापिका सौ. भाग्यश्री राऊ मॅडम, उत्तम राऊ सर, विठ्ठल गोरे सर, रविंद्र महाकाळ, विलास गावित, कोंडू महाकाळ, मनोहर महाकाळ तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच गावातील ग्रामस्थ, युवा वर्ग व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वांच्या सहभागातून वृक्षलागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित गाव आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व सुंदर वातावरण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
गावातील ग्रामस्थ, युवा वर्ग आणि महिला मंडळाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा वृक्षलागवड कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.










