Majha Gav Majha Shahr

कर्मवीर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक जनजागृतीपर व्याख्यान

एच.आय.व्ही./एड्स, किशोरवयीन जीवन कौशल्य, मानसिक आरोग्य व मादक पदार्थांच्या दुरुपयोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पालघर / सचिन वझरे

 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनिअर कॉलेज, जुचंद्र येथे इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही./एड्स, किशोरवयीन जीवन कौशल्य, किशोरावस्था व वाढते वय, पौगंडावस्था, प्रजननक्षम व लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्याच्या समस्या तसेच मादक पदार्थांचा दुरुपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

विरार सरकारी दवाखान्यातील नेताजी निकम व रतन दातखिळे यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. किशोरवयात शरीरात व मानसिकतेत होणारे बदल, आरोग्याची काळजी आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. योग्य वयात योग्य आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांना अनेक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

तरुणाईला योग्य वयात आरोग्य, मानसिकता आणि व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन मिळणे आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होते, असे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावडे मयुरी यांनी केले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षक कदम उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें