Majha Gav Majha Shahr

 

विक्रमगड तालुक्यातील ५० गावांमध्ये ‘हमारा गाव’ उपक्रमांतर्गत वॉर्म अप कृतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

विक्रमगड

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या ‘हमारा गाव’ उपक्रमांतर्गत विक्रमगड तालुक्यातील ५० गावांमध्ये इयत्ता १ ली व २ रीच्या मुलांसोबत वॉर्म अप कृती प्रभावीपणे राबविण्यात आल्या.

या कृतींमध्ये शारीरिक विकासाचे खेळ, गोष्टी व गाणी, लेखन, कला व हस्तकला (Art & Craft), सर्जनात्मक व ध्यानात्मक विकास तसेच तोंडी गणित यांचा समावेश करण्यात आला. विविध कृतींमध्ये मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मुले आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होत असल्याने कृती घेणाऱ्या CIM मध्येही अधिक उत्साह निर्माण झाला.

वॉर्म अप कृतींमुळे मुलांमध्ये आनंदी व सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासोबतच त्यांचा शारीरिक, बौद्धिक, सर्जनात्मक आणि गणितीय विकास साधण्यास मदत होत आहे. या प्रक्रियेत मूल आणि CIM यांच्यामध्ये चांगला समन्वय व संवाद निर्माण होताना दिसून आला.

मुलांचा वाढता सहभाग आणि कृतींबद्दलची उत्सुकता पाहता, वॉर्म अप कृतींच्या माध्यमातून पुढील मुख्य कृती (Main Activity) अधिक प्रभावीपणे राबविण्यास निश्चितच मदत होईल. मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करून त्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण प्रक्रियेशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सकारात्मक ठरत आहे. यासाठी विक्रमगड हमारा गाव संपूर्ण टीम परिश्रम घेत आहेत.

टीम लीडर- प्रदिप वारंगडे , हेमंत मेथवाले ,cim- सविता कोरडा, मुकेश लहानगे, नितेश काकड, दिलदार फडवले, भावेश खरपडे, रविना फरारा, पूनम कुऱ्हाडा, सुवर्णा वावरे, बाळकृष्ण घाटाल, जागृती तारवी आणि एकनाथ उमतोल.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें