Majha Gav Majha Shahr

ई-पेपर

*महिलांच्या सक्षमीकरणासाठी 20 शिलाई मशीनचे वाटप* विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड विक्रमगड, दि. 14 जून 2026 : वनवासी कल्याण आश्रम, विक्रमगड येथे चेंज मेकर्स ग्रुपच्या सदस्यांच्या सौजन्याने 20 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे आहे. चेंज मेकर्स ग्रुपचे सदस्य निखिल गांधी, हिना गांधी व इतर सदस्यांच्या सहकार्याने विक्रमगड तालुक्यातील पलाटपाडा येथील 10 महिला, चिंचपाडा येथील 9 महिला आणि दादडे येथील 1 महिला अशा एकूण 20 महिलांना शिलाई मशीन प्रदान करण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत केवळ शिलाई मशीनचे वाटपच नव्हे, तर लाभार्थी महिलांना पुढील काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचाही संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमावेळी वनवासी कल्याण आश्रम, विक्रमगड समितीच्या सदस्या रेखा मालकरी तसेच दुर्वास पवार, देवराम धांगडा, संजय पारधी, सुभाष सुरूम आणि विजय मेघवाली उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजात अधिक प्रमाणात राबविण्याची गरज व्यक्त केली

महिलांच्या सक्षमीकरणासाठी 20 शिलाई मशीनचे वाटप विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड विक्रमगड, दि. 14 जून 2026 : वनवासी कल्याण आश्रम, विक्रमगड येथे चेंज मेकर्स ग्रुपच्या

Read More »

कळमगावात “स्वप्नातील गाव” उपक्रमाचा शुभारंभ; लोकसहभागातून विकासाला नवी दिशा मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं शहर वृत्तसेवा  मोखाडा तालुक्यातील कळमगाव येथे स्वदेस फाऊंडेशन, शासन

Read More »

  कुंभा डोंगर हिरवागार करण्यासाठी ग्रामसभा वेतागवाडीचा पुढाकार; 12 जून रोजी भव्य श्रमदानातून बियाणे लागवड मोहीम. प्रतिनिधी दीपक भोये  विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील ग्रामसभा वेतागवाडी (खुडेद)

Read More »

विकलांगता मुक्त पालघरसाठी कटिबद्ध! – खासदार डॉ. हेमंत सवरा पालघर प्रतिनिधी माझं गावं माझं शहर वृत्तसेवा सचिन वझरे विकलांगता मुक्त पालघर अभियानांतर्गत १८ वर्षे पर्यंत

Read More »

जाहिरातींच्या फलकांनी झाडांचा रोखला श्वास; वृक्षसंवर्धनाला धोका? मोखाडा / सचिन वझरे  *माझं गावं माझं शहर वृत्तसेवा* मोखाडा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या झाडांवर विविध शैक्षणिक संस्था,

Read More »

जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने घानवळ गावातील अनेक कुटुंबाचे अतोनात नुकसान खरपडे कुटुंबाचे पुन्हा यावर्षीही घराचे नुकसान; शासनाकडून मदतीची प्रतीक्षा मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं

Read More »

पाणी हे जीवन आहे याची दखल घेत गावकऱ्यांनी केली विहिरीची स्वछता – सुदाम खरपडे यांच्या पुढाकारने विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड माझं गावं माझं शहर

Read More »

मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर दोन व्यक्ती ठार तर दोन जण गंभीर मोखाडा / सचिन वझरे  माझं गावं माझं शहर वृत्तसेवा मोखाडा तालुक्यातील

Read More »

धानीवारीजवळील भीषण रस्ता अपघाताबाबत पालघर जिल्हा प्रशासनाचे निवेदन; १३ जणांचा मृत्यू पालघर, दि. १८ मे २०२६ : आज सायंकाळी अंदाजे ४:०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर

Read More »

द प्राइड इंडिया’ आणि कृषी विभागामार्फत बरवाडपाडा येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न; ८४ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग *जव्हार (प्रतिनिधी) :* तालुक्यातील बरवाडपाडा येथे ‘द प्राइड इंडिया’

Read More »