कुंभा डोंगर हिरवागार करण्यासाठी ग्रामसभा वेतागवाडीचा पुढाकार; 12 जून रोजी भव्य श्रमदानातून बियाणे लागवड मोहीम.

प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील ग्रामसभा वेतागवाडी (खुडेद) येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रामध्ये बियाणे रोपणासाठी भव्य श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. वयम चळवळीच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत कुंभा डोंगर हिरवागार करण्यासाठी ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले .
या मोहिमेमध्ये काजू बी 500, जांभूळ बी 150, मोहटी 500, आंबा बाठे 200,फणस बी 80, चिंच बी 200 अशा विविध 1630 बीयांची लागवड करण्यात आली असून, पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण हा मुख्य उद्देश आहे. सामूहिक वनहक्क क्षेत्राचा विकास करून भविष्यात हरित आणि समृद्ध परिसर निर्माण करण्याचा संकल्प ग्रामसभेने केला आहे.
धरतरी पालथा कार्यक्रम शुक्रवार, दि. 12 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी 7:00 वाजता ग्रामसभा कार्यालय, वेतागवाडी येथे सर्व सहभागी एकत्र जमले . त्यानंतर सकाळी 11:30 वाजेपर्यंत कुंभा डोंगर परिसरात श्रमदान व बियाणे लागवड करण्यात आले . सहभागींसाठी दुपारी 12:30 वाजता सामूहिक भोजनाची व्यवस्था ग्रामसभा कार्यालयात करण्यात आली.










