Majha Gav Majha Shahr

घानवळ आश्रमशाळेत घटस्थापना व आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मोखाडा / सचिन वझरे

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा घानवळ, ता. मोखाडा, जि. पालघर येथे दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापना व आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

या मार्गदर्शन शिबिरात *प्राथमिक आरोग्य केंद्र, आसे येथील डॉ. मुंडे व परिचारिका – रूपाली पडघे* यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि योग्य आहार याविषयी मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

तसेच विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, हेअरस्टाईल स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले.

या कार्यक्रमाला पत्रकार मनोज वारघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. घटस्थापना आणि आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें