Majha Gav Majha Shahr

स्वयंसेवकांचा सहभाग आणि कौशल्य विकास

विक्रमगड ब्लॉकमध्ये Pratham Education Foundation आणि P&G यांच्या संयुक्त विद्यमाने………

“Hamara Gaon” उपक्रम सध्या ५० गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांसोबत विविध शैक्षणिक कृती घेतल्या जातात, तर इयत्ता ३ री ते ५ वी व ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी Children’s Club उपक्रम राबविला जातो. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः Creativity Clubच्या माध्यमातून विविध कृती व टास्क दिले जातात.

या सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये गावातील स्थानिक युवक आणि समुदायातील स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वयंसेवक गावातील मुलांपर्यंत उपक्रमातील टास्क पोहोचवतात, मुलांना त्याबाबत मार्गदर्शन करतात आणि दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे मुलांमध्ये सहभाग, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिकण्याची आवड निर्माण होण्यास मदत होत आहे.

स्वयंसेवकांच्या स्वतःच्या कौशल्यविकासासाठी त्यांना EFE Courseच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांना PLP वर नोंदणी करून त्यांना दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे स्वयंसेवकांमध्ये डिजिटल कौशल्य, जबाबदारीची भावना आणि स्वतःच्या विकासासाठी शिकण्याची वृत्ती वाढण्यास मदत झाली आहे.

यासोबतच स्वयंसेवकांसाठी Biodata, Resume आणि CV याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. Biodata, Resume आणि CV यामधील फरक, त्यांचा उपयोग, तसेच स्वतःची शैक्षणिक व कौशल्यविषयक माहिती प्रभावीपणे कशी मांडावी याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे स्वयंसेवक केवळ मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करत नसून, स्वतःच्या शिक्षण, कौशल्यविकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठीही सक्षम होत आहेत. गावातील युवकांचा हा सक्रिय सहभाग “Hamara Gaon” उपक्रमाला अधिक प्रभावी आणि शाश्वत बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे.

हे घेत असताना प्रथम TL/CIM उपस्थित होते.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें