Majha Gav Majha Shahr

मोखाडा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मैत्री फाऊंडेशनचे सायकल वाटप…

  • मोखाडा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मैत्री फाऊंडेशनचे सायकल वाटप…
    मोखाडा – सचिन वझरे आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी सोई – सुविधान अभावी शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडू नयेत या विधायक हेतूने ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मैत्री फाऊंडेशन , बोरवली यांच्या तर्फे समाजोपयोगी उपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आदिवासी हायस्कूल मो-हांडा,पोशेरा व वाशाळा या तीनही हायस्कूलला प्रत्येकी 20 अशा 60 सायकलींचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम हा आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे पार पडला. या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन हे जुचंद्र ता. वसई येथील शिवछत्रपती समाजसेवा मंडळाने केले होते. मैत्री फाऊंडेशनचे विश्वस्त वेदांत राजे त्रिवेदी ,पियुष त्रिवेदी, पियुष पटेल यांच्या हस्ते प्रत्येक शाळेला 20 सायकली वाटप करण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट , फ्रुटी, बिस्किट वाटप इ. चे करण्यात आले.तसेच शिव छत्रपती समाजसेवा मंडळ – जुचंद्र यांच्यातर्फे आदिवासी हायस्कूल मो-हांडा यांना एक शालेय कामकाजासाठी एक लॅपटॉप देखील देण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडळाचे संस्थापक – पुरुषोत्तम पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी रोज आई-वडिलांचा पाया पडून आशीर्वाद घ्यावेत. तसेच शिक्षण व अध्यात्माची सांगड घातल्यास आपण जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.तसेच मंडळाचे संस्थापक किरण म्हात्रे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की,प्रभारी मो-हांडा हायस्कुलचे प्रभारी मुख्याध्यापक सोनवणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्ही हे सर्व करू शकलो. त्यांचे वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभते त्यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम हा यशस्वी झालेला आहे. छत्रपती समाजसेवा मंडळातर्फे याप्रसंगी विद्याधर म्हात्रे, नारायण म्हात्रे, किशोर पाटील तसेच ,पोशेरा, मो-हांडा, वाशाळा हायस्कुल चे मुख्याध्यापक,पोशेरा ग्रामपंचायतचे सरपंच, स्कूल कमिटी चे सर्व सदस्य , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे आदिवासी हायस्कूल – पोशेराचे उपशिक्षक सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन मो-हाडा हायस्कूलचे शिक्षक हर्षवर्धन लढे यांनी केले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें