Majha Gav Majha Shahr

अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा – खासदार डॉ. हेमंत सवरा.

अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा – खासदार डॉ. हेमंत सवरा.पालघर – खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री व पालक मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या कडे तात्काळ मदतीची मागणी पत्राद्वारे केली आहे. पालघर जिल्ह्यांमध्ये २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चक्रीवादळसदृश अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे. त्यांनी पत्राद्वारे खालील तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत-.1. पालघर जिल्ह्यांतील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत. 2. शेतकरी आणि नागरिकांना तातडीने आर्थिक मदत तसेच पुनर्वसनाची सुविधा पुरवावी. 3. आवश्यक तरतुदी करून मदत कार्य जलदगतीने सुरू करावे.4. प्रभावित भागात आरोग्य सुविधा, अन्नपाणी, निवारा व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाय त्वरित राबवावेत. या पत्रामधील मागण्यांमुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल व बाधित शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल असा आशावाद खासदार डॉ. सवरा यांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें