Majha Gav Majha Shahr

लायन्स क्लब मुंबई मॅजेस्टिक कडून गुरवपाडा येथे दिवाळी फराळवाटप.

लायन्स क्लब मुंबई मॅजेस्टिक कडून गुरवपाडा येथे दिवाळी फराळवाटप.

प्रतिनिधी: दीपक भोये विक्रमगड लायन्स क्लब मुंबई मॅजेस्टिक कडून गुरवपाडा येथे दिवाळी फराळवाटप*दिवाळी सणानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी पालकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून लायन्स क्लब ऑफ मुंबई मॅजेस्टिक मुलुंड यांजकडून धनत्रयोदशी दिनी दिवाळी फराळ व उटणे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोपेसाहेब, दिलीप देशमुख, प्रमोद वैद्य, यशवंत सुर्वेसाहेब उपस्थित होते.सणाच्या काळात मुलांना फराळ देवून या भागाची, समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली तसेच मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सर्वांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहून आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे देशमुखसाहेब म्हणाले.या कार्यक्रमात गुरवपाडा सवादे शाळेचे शिक्षक केशव भोये सर यांच्या प्रयत्नाने व नियोजनाने कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला.सर्व विद्यार्थी व पालकांनी लायन्स क्लबचे आभार

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें