Majha Gav Majha Shahr

दहावी बारावी परीक्षा जीवनाला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची प्रदीप वाघ…

दहावी बारावी परीक्षा जीवनाला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची प्रदीप वाघ…

मोखाडा / सचिन वझरे . माझं गाव माझं शहर.

वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समिती चे माजी सभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की जीवनात दहावी आणि बारावीची परीक्षा खुप महत्वाची आहे, आनंदी व उत्साही मनाने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे कुठलाही दडपण न घेता परीक्षा द्या व वाकडपाडा हायस्कूल ची यशस्वी परंपरा कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच वाकडपाडा हायस्कूल च्या शिक्षकांची देखील वाघ यांनी प्रशंसा केली.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना भावुक झाले होते.शाळेच्या आठवणी सांगताना विद्यार्थींनीचे डोळे पाणावले होते.या कार्यक्रमाला उपाध्यक्ष मिलिंद झोले यांनी देखील विद्यार्थी दिशेतील आठवणींना उजाळा दिला, तसेच पोलीस पाटील विठ्ठल गोडे यांनी सांगितले की परीक्षा देत असताना आपला अभ्यासाचा सराव नियमित पणे ठेवला पाहिजे तर परीक्षा यशस्वीरीत्या पास झाल्या शिवाय राहणार नाही.शाळेचे मुख्याध्यापक उत्तम ठवरे यांनी सांगितले की आम्ही शिक्षणा बरोबरच चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला आहे, निश्चितच या वर्षी देखील शाळेचा परिक्षेचा निकाल हा शंभर टक्के लागणार अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप वाघ, उपाध्यक्ष मिलिंद झोले, उपसरपंच नंदकुमार वाघ, स्पार्क फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नितिन पिठोले, सदस्य परशुराम गवारी,हरीश्चंद्र खाडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें