Majha Gav Majha Shahr

 


डहाणू, तलासरी मधील ‘पेसा मोबिलायझर’ ताईंची कासा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

*कासा (ता. डहाणू):

माझं गावं माझं शहर वृत्तसेवा दिपक भोये पालघर

डहाणू, तलासरी तालुक्यातील पेसा मोबिलायझर ताईंची एक विशेष बैठक आज कासा येथील पू. आचार्य भिसे विद्यालयात उत्साहात पार पडली. ग्रामपंचायत स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी आणि शासनाचे नवीन धोरण यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

*कामातील आव्हानांवर मंथन*

बैठकीच्या सुरुवातीला ग्रामपंचायत स्तरावर ‘पेसा’ (PESA) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करताना मोबिलायझर ताईंना कोणत्या प्रशासकीय व व्यावहारिक अडचणी येत आहेत, याचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी कामाचा व्याप आणि समन्वयाचा अभाव यावर ताईंनी आपली मते मांडली. या अडचणींवर एकत्रितपणे मात करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

*शासकीय पत्रावर चर्चा*

शासनाकडून पेसा मोबिलायझर पदांच्या संख्येबाबत नुकतेच एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रातील तरतुदी आणि भविष्यातील पदसंख्येविषयी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या निर्णयाचा स्थानिक स्तरावरील कामावर काय परिणाम होईल, याबाबतही मोबिलायझर ताईंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

*तालुका कमिट्यांचे गठन*

संघटन अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीत डहाणू, तलासरी तालुक्यांसाठी स्वतंत्र ‘तालुका कमिटी’ गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.डहाणू तालुक्याच्या कमिटीत अलका दुमाडा -अध्यक्ष,अरुणा धापशी -उपाध्यक्ष, अरुणा भोये – सचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच तलासरी तालुक्याची कमिटी लवकरच गठीत करण्यात येईल असे ठरले. या कमिट्यांच्या माध्यमातून आगामी काळात स्थानिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जाणार आहेत.

या बैठकीला वयम चळवळीचे कार्यकर्ते भारत पाटारा,विक्रमगड मधील खुडेद ग्रामपंचायत च्या मोबिलायझर सुशिला पाटारा तसेच डहाणू, तलासरी या दोन्ही तालुक्यातील पेसा मोबिलायझर ताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वेळेवर उपस्थित राहून सर्वांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे बैठकीचा मूळ हेतू यशस्वी झाला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें