Majha Gav Majha Shahr

पाणी हे जीवन आहे याची दखल घेत गावकऱ्यांनी केली विहिरीची स्वछता – सुदाम खरपडे यांच्या पुढाकारने

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड माझं गावं माझं शहर वृत्तसेवा

विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील विविध गावामध्ये शासनाने पाणी हे जीवन आहे याची दखल घेत विहीर याची सोय करून दिली असता या विहिरी मध्ये खुप वर्षानुवर्षे पाणी हे साठलेले असते आणि याचा पिण्यासाठी केला जातो परंतु जास्त काळ पाणी हा साठल्यामुळे त्यामध्ये पिण्या योग्य नसते म्हणून त्याची निगराणी राखत गावातील ग्रामस्थ हे त्या विहिरीची स्वछता करत असतात असेच एक विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी खुर्द या गावातील ग्रामस्थांनी विहिरी मध्ये पाणी हे स्वच्छ असावे म्हणून या गावातील रहवाशी सुदाम खरपडे यांच्या पुढाकाराने गावातील सर्व ग्रामस्थ मिळून विहिरीची स्वच्छता करून आणि आपल्या आरोग्याची दक्षता घेऊन योग्य रीतीने विहीर स्वच्छ करण्यात आली.

याची गावातील सर्व ग्रामस्थानी पूर्ण मेहनत घेऊन मुख्य म्हणजे सुदाम खरपडे यांनी पुढाकार घेत तसेच गणेश खरपडे, प्रमेश कुवरा, संदीप कुवरा सीताराम रोज, अशोक रिंजड आणि शिधिका रिंजड आणि पूर्ण ग्रामस्थांनी सहकार्य करून विहिरीची पूर्णपणे साफसफाई करून घेतली.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें