Majha Gav Majha Shahr

विकलांगता मुक्त पालघरसाठी कटिबद्ध!

– खासदार डॉ. हेमंत सवरा

पालघर प्रतिनिधी माझं गावं माझं शहर वृत्तसेवा सचिन वझरे

विकलांगता मुक्त पालघर अभियानांतर्गत १८ वर्षे पर्यंत वयोगट अस्थिव्यंग रुग्ण तपासणी शिबिर शनिवार 0६ जून २०२६ रोजी जिल्हा रूग्णालय पालघर येथे पार पडले.विष्णु सवरा सामाजिक न्यास , इनस्टिट्यूट ऑफ

पेडियाट्रिक डिसऑर्डर्स मुंबई व मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. श्री हेमंत विष्णु सवरा यांनी हा संकल्प बोलून दाखवला. पंतप्रधान मा.श्री नरेन्द्र मोदी साहेब व मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेरणेने ; महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णु रामा सवरा यांच्या नावाने स्थापन केलेल्या विश्वस्त न्यासच्या माध्यमातून पालघर लोकसभा क्षेत्रात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्याची मुहूर्तमेढ या शिबिराने आज पालघर मध्ये रोवली गेली. उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी श्री भरतभाई राजपूत भाजपा जिल्हाध्यक्ष, मातोश्री श्रीमती जयश्रीताई सवरा, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. तरल नागदा, भाजपाचे जेष्ठ नेते श्री बाबाजी काठोळे ,श्री कुंदन संखे शिवसेना जिल्हाध्यक्ष ,श्री उत्तम घरत नगराध्यक्ष पालघर ,डॉ.मराड, डॉ. जयदीप ढमेले,श्री भावानंद संखे, ऍड जयेश आव्हाड , वाडा नगराध्यक्षा सौ रिमाताई गंधे,श्री कैलास म्हात्रे ,निशाताई सवरा आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातून एकूण १८२ अस्थी विकलांग रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यापैकी ६२रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे करण्यात येणार आहेत. ४० रुग्णांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांच्या माध्यमातून विकलांगतेवर मात करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुका पासून पालघर पर्यंत मोफत प्रवास सेवा, नाश्ता- भोजन, तातडीचा औषध उपचार अशा सर्व सुविधा विष्णू सवरा सामाजिक न्यास यांच्या माध्यमातून पुरविण्यात आली. पालघर जिल्हा आरबीएसके टीम यांच्या माध्यमातून रुग्ण संपर्क व इतर बहुमोल सहकार्य शिबिरामध्ये लाभले. शिबिराचे सर्वांगसुंदर आयोजन व नियोजन याबाबत रुग्णांचे नातेवाईक उपस्थित पाहुणे व मान्यवर यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा व त्यांचे पक्ष सहकारी, मित्र मंडळ यांचे अभिनंदन केले. भविष्यात पालघर जिल्हा विकलांग मुक्त करण्यासाठी विकलांगतेच्या सर्व समस्यांवर कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी विष्णु सवरा सामाजिक न्यास सोबत अखंड काम करत राहणार अशी आश्वासक भावना डॉ तरल नागदा यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भरत भाई राजपूत यांनी खासदार डॉक्टर हेमंत विष्णु सवरा यांच्या कामाची शैली, सातत्य व अभ्यासू वृत्ती, याबाबत कौतुकाची भावना व्यक्त केली. आपल्या राजकीय सोबती बरोबरच प्रत्येक सामाजिक हिताच्या उपक्रमामध्ये आम्ही सदोदित आपल्या सोबत आहोत अशी भूमिका श्री कुंदन संखे यांनी व्यक्त केली. शिबिरात उपस्थित सर्व मान्यवर, रुग्ण नातेवाईक, आयोजनातील सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे डॉ. हेमंत सवरा यांनी आभार मानले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी विश्वस्त न्यास चे स्वयंसेवक, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कर्मचारी, आर बी एस के पालघर जिल्हा,आशा सेविका पालघर जिल्हा यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें