तलवाडा ग्रामपंचायतीत पाणी समस्यांबाबत शिष्टमंडळ; श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

विक्रमगड – प्रशांत दाव्हाड माझं गावं माझं शहर वृत्तसेवा
*विक्रमगड/तलवाडा, दि. 11 जून 2026 : ग्रुप ग्रामपंचायत तलवाडा येथे आज श्रमजीवी संघटना महाराष्ट्रच्या तालुका महिला सचिव पूनम भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीटंचाईच्या गंभीर समस्येबाबत शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन सादर केले.
यावेळी अनेक गाव व पाड्यांमधील नागरिकांनी पाण्याच्या तीव्र समस्यांची माहिती मांडली. पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. गावकऱ्यांनी पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली.
शिष्टमंडळाने ग्रामसेवकांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत पाणी समस्येवर ठोस निर्णय घेतला जात नाही आणि नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयातून उठणार नाही. नागरिकांच्या तीव्र भावना व मागणी लक्षात घेऊन संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली.
ज्या भागांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी बोअरवेल खोदण्याच्या कामास त्वरित सुरुवात करण्यात आली. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या मागणीला यश मिळाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संघटक सचिव रूपेश भाऊ डोले, ग्रामपंचायत अध्यक्ष शरद वाजे, मंदा ताई, भगवान भाऊ, संदीप भोये तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बोअरवेलची वेवस्था केली. बोअरवेलचे उदघाटन राज्याचे संघटक सचिव रुपेश डोळे, मंदा डुकले, तालुका महिला सचिव पूनम भोये शरद वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.










