Majha Gav Majha Shahr

ग्रामविकास मंत्री व आदिवासी विकास मंत्री यांचेशी झालेल्या

चर्चेनंतर,आझाद मैदान येथे सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित

भर पावसात हजारो पेसा मोबिलाईझर होत्या उपस्थित….

माझं गावं माझं शहर वृत्तसेवा दिपक भोये

आज आझाद मैदान येथे सुरु असलेल्या पेसा मोबिलाईझर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे व राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.

डॉ. अशोक उईके यांची आज पेसा मोबिलाईझर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा सोबत सविस्तर बैठक स्वतंत्रपणे पार पडल्या.

 

या बैठकीत पेसा मोबिलाईझरची पदे कमी करू नये या मागणी विषयी अत्यन्त सकारात्मक व समाधान कारक चर्चा पार पडली.

 

येत्या 15 जुलैला मंत्रालयात पुन्हा समिती च्या शिष्टमंडळा सोबत सविस्तर मिटिंग मंत्रालयात पार पडणार आहे. या बैठकीला

मा. ग्रामविकास मंत्री,

मा. आदिवासी विकास मंत्री दोन्ही विभागाचे प्रधानसचिव या उपस्थित असणार आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर आज दिवसभर भर पावसात सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.

 

यावेळी या आंदोलनाचा समारोप करताना,

कॉ. मरियम ढवळे,

डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, डॉ. अमोल वाघमारे,

कॉ.आयआरटी इराणी यांनी मनोगत व्यक्त केले.

 

संपूर्ण दिवसभर महाराष्ट्र राज्याच्या 13 आदिवासी बहुल जिल्ह्यातील ज्यात गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ,

नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यातील उपस्थित

पेसा मोबिलाईझर यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला…

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें