Majha Gav Majha Shahr

खोच येथील अतिवृष्टीग्रस्त कविता घाटाळ यांच्या कुटुंबाला आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचा आधार 

खोच येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या कुटुंबाची प्रत्यक्ष पाहणी…

मोखाडा / सचिन वझरे माझं गावं माझं शहर

मोखाडा तालुक्यातील खोच येथील रहिवासी श्रीमती कविता घाटाळ यांचे घर नुकत्याच झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोसळल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि बाधित कुटुंबाला धीर देत मदतीचा हात पुढे केला.

यावेळी समितीचे मार्गदर्शक तथा माजी सभापती प्रदीप वाघ यांनी श्रीमती कविता घाटाळ यांना रोख आर्थिक मदत तसेच जीवनावश्यक शिधा साहित्य सुपूर्द केले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे घर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. संकटाच्या काळात समाजाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी मानवता असल्याचे प्रतिपादन प्रदीप वाघ यांनी यावेळी केले.तसेच शासनाकडून मिळणाऱ्या सर्व मदतीसाठी आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करून संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोणतेही आपत्तीग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती सातत्याने कार्यरत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

घाटाळ कुटुंबीयांनी या मदतीबद्दल समितीचे आणि प्रदीप वाघ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा कठीण प्रसंगी सामाजिक संस्थांनी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अशा संकटग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत मिळावी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने व्हावी, अशी मागणीही यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. या वेळी माजी सभापती युवराज गिरंधले, निलेश झुगरे विठ्ठल गोडे नंदू वाघ गणेश वाघ मयूर मंगेश दाते पत्रकार ज्ञानेश्वर पालवे अन्य सदस्य उपस्थित होतेआदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या या मदतीमुळे संकटग्रस्त घाटाळ कुटुंबाला दिलासा मिळाला असून, सामाजिक बांधिलकीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें