Majha Gav Majha Shahr

वळण ओझरखेड येथे घाटाळ कुळ संमेलन

  • वळण ओझरखेड येथे घाटाळ कुळ संमेलन….

  • रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी वळण – ओझरखेड ता. त्रिंबकेश्वर येथे. घाटाळ कुळ कुटुंब परिवाराचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
    या कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील अनेक कुटुंब परिवार सामील झाले होते. स्नेहसंमेलनाचे हे १७ वे वर्ष होते. वळण - ओझर येथे सकाळी १० वा. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवाीत झाली. सदर कार्यक्रमासाठी भगवान बारकु घाटाळ यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नंतर पाहुण्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थी सत्कार व देवरामभाई, शिवरामभाई, गजूभाई, अशोकभाई, छनुभाई, यशवंतदादा, अनंतसर, माधवदादा या सर्वच घाटाळ बांधव मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमात बापुदादा, जानु दादा, दिनकरदादा, विलासदादा सरपंच, कैलासदादा मा.सरपंच, रविंद्र सर, वसंतभाई, जमसुभाई, महेशभाऊ, सुधिरभाऊ, संतोषभाऊ, घाटाळ कुळदैवतांचे प्रमुख पुजारी. गुजरात-वलसाड, सुरगाणा-नाशिक पासुन, ते पालघर - ठाणे - मुंबई - नवीमुंबई पर्यंतचे घाटाळ कुळ कुटुंब बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतदादा व चंद्रकांतसर यांनी केलें. आभार प्रदर्शनाची जबाबदारी स्थानिक कमिटी सदस्य हिरामण दादा यांनी पार पडली. स्नेह भोजनानंतर भेटी - गाठी केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
    मोठ्या उत्साहात घाटाळ कुळ परिवार उपस्थित होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें