
76 वा प्रजासत्ताक दिन नूतन विद्यामंदिर उमरोळी शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न…
पालघर. वैभव देवरे.
ग्रामीण शिक्षण संस्था , संचालित नूतन विद्यामंदिर उमरोळी शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने . सकाळी ठीक साडे सात वाजता प्रभात फेरी काढून संपूर्ण गावात प्रजासत्ताक दिना निमित्त जागरूक्ता राबवण्यात आली. देशप्रेम बंधुत्व. विद्यार्थिनी विविध घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली .उमरोळी गावात प्रथम जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामपंचायत सदस्या सौ.भाविका विरंजन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्या नंतर उमरोळी ग्रामपंचायत येथे विद्यमान सरपंच श्री.प्रभाकर पांडुरंग पाटील याचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांना संबोधित करतेवेळी प्लास्टिक मुक्त उमरोळी गाव ग्रामस्थांना शपथ दिली. आपल्या गावाला iso नामांकन मिसळले आहे. ही बाब कौतुकाची आहे. सोलर पॅनल, सौर ऊर्जेचा वापर करावा आणि माहेर वासीन कार्यक्रम हा विषय आमंत्रित करण्यात आले.त्या नंतर ग्रामीण शिक्षण संस्था संचालित
.
नूतन विद्या उमरोळी येथे उमरोळी रोटरी कल्ब चे अध्यक्ष श्री.सागर रमेश घरत ह्यांच्या हस्ते ठीक साडे आठ वाजता ध्वजारोहण करून समस्त ग्रामस्थांना व विद्यार्थ्याना त्यांनी प्रजासत्ताक दिना च्या शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी लेझिम , तारपा नृत्य, बीहु नृत्य, विविध कवायती प्रकार ,मल्लखांब कसरती सारखे विविध प्रकारात विद्यार्थ्यानी सहभाग घेवून सादर केले .ह्यावेळेस ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उमरोळी ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच श्री. प्रभाकर पांडुरंग पाटील , शालेय शिक्षण संमिती उमरोळी अध्यक्ष श्री.राजेश पाटील , ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य व शालेय शिक्षण समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य . शाळेचे मुख्यधापक श्री. संजय घरत . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समस्त ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते . त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला







