Majha Gav Majha Shahr

कावळे आश्रमशाळेत संविधान जागृती; विवेक भाऊ पंडित यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

विक्रमगड, दि. ४ ऑगस्ट : आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष मा. विवेक भाऊ पंडित यांच्या अधिकृत दौऱ्यांतर्गत विक्रमगड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, कावळे येथे भेट व पाहणी दौरा पार पडला.

या दौऱ्यादरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘संविधान जागृती कार्यक्रम व विद्यार्थ्यांसोबत संवाद’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवेक भाऊ पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले.

विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेण्यापुरते मर्यादित न राहता संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्ये आणि मूल्ये समजून घेतली पाहिजेत, तसेच शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आले पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर संवाद साधला. संविधानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांच्यामध्ये समानता, सामाजिक जाणीव, स्वाभिमान आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या अधिकृत दौऱ्यात आश्रमशाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणासह विविध बाबींचाही आढावा घेण्यात आला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें