Majha Gav Majha Shahr

शिक्षक भारती वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

कल्याण – (सचिन शेलवले )

शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेला 21 वर्षे पूर्ण झाले असून अनेक शाळा, संस्थापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या प्रश्नांवर निस्वार्थपणे सुंदर काम केलेले आहे. तसेच, महाराष्ट्रभर ही संघटना केवळ संघटना नसून फुले,शाहू,आंबेडकर या विचारांची चळवळ आहे. यावर्षी वर्धापन दिन साजरा करतांना ठाणे जिल्ह्याच्या वतीने सामाजिक योगदान म्हणून वृक्षारोपण, शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे कल्याण येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्री. संदीप पाटील,अंबरनाथ, सौ. सुनिता ओतुरकर,बदलापूर, श्री नितीन चव्हाण, ठाणे व मधुकर हरणे, शहापूर यांनी काम पाहिले. स्पर्धांमध्ये सध्याच्या घडामोडींवर शिक्षक व विद्यार्थ्यांना विषय देण्यात आले होते. अतिशय अभ्यासपूर्ण शिक्षकांनी निबंधातून तर विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या वकृत्वातून विचार मांडले. स्पर्धेसाठी शिक्षक गटासाठी पहिले बक्षीस 5555/- रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी. दुसरा विजेता क्रमांक 3333/- रूपये रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी. तिसरे बक्षीस 1111/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी व विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा प्रत्येक गटासाठी प्रथम विजेता क्रमांक 3333/-रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी. दुसरा विजेता क्रमांक 2222/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी. तिसरा विजेता क्रमांक 1111/-रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी. निबंध स्पर्धेत शिक्षक प्रथम क्रमांक- श्री. संदेश कृष्णदेव गायकवाड, सहशिक्षक, जीवनदीप कॉलेज, दळखण, खर्डी. द्वितीय क्रमांक- श्री. दिगंबर सिताराम खरात, सहशिक्षक- ग. वि.खाडे विद्यालय व जुनिअर कॉलेज, शहापूर, तृतीय क्रमांक- प्रमोद पांडुरंग शिंदे, जि.प. शाळा लतीफवाडी, ता शहापूर. वक्तृत्व स्पर्धा- इयत्ता 8वी ते 10वी गट नंबर-1, प्रथम क्रमांक विजेती कु. वज्रेश्वरी सुभाष बन इयत्ता 10वी, ज्ञानप्रसारिणी माध्यमिक शाळा, कळवा,तसेच, व्दितीय क्रमांक- कु. आराधना कैलास तांबे, 9 वी प्रेमाबाई सुप्रिया पाटील विद्यालय, कारिवली, ता. भिवंडी व कु.अर्णव राजेश वाळिंबे, 10 वी, जिंदाल विद्यामंदिर, वासिंद ता.शहापूर वक्तृत्व स्पर्धा- इ.11वी व 12वी, गट नंबर 2, प्रथम क्रमांक विजेती, सानिका शिवाजी घारे, 12वी, जीवनदीप काॅलेज,दळखण, खर्डी. द्वितीय क्रमांक विजेता- पार्थ पंकज धानके, 11वी, जीवनदीप कॉलेज,दळखण, खर्डी, तृतीय विजेता क्रमांक- मृण्मयी भुषण सासे, 12 वी, जिंदाल विद्यामंदिर, वासिंद यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. संतोष कांबळे,शिक्षणाधिकारी, योजना विभाग, चेंबूर तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व संस्थापक, रविंद्र घोडविंदे सर यावेळी उपस्थित होते. पाहुण्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक जाणीव म्हणून शिक्षक भारती तर्फे कांबारे आणि अंदाड गावी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. कल्याण येथील कार्यक्रमासाठी शिक्षक भारतीचे माध्यमिक जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे, प्राथमिक जिल्हाध्यक्ष, सुरेश विशे, उपाध्यक्ष, सागर चौधरी, शहापूर तालुका अध्यक्ष दिनेश वाघ, संघटक, समाधान पाटील, मधुकर हरणे, सचिन शेलवले, सुनिल निचिते, सुधीर तारमळे, दिगंबर खरात, अनिता गोसावी, मगर मॅडम व इतर अनेक स्पर्धेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे सर, प्रास्ताविक एकनाथ तारमळे सर, तर आभार प्रदर्शन मधुकर हरणे सर यांनी केले. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती ही संघटना नेहमीच कार्यरत आहे व राहील.अखेर शिक्षक भारतीचा वर्धापन दिन अतिशय आनंदात व उत्साहानं साजरा झाला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें