Majha Gav Majha Shahr

*lडोल्हारी खुर्द येथे महिलांसाठी शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी शिबिर_महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत ९५ महिलांची नोंदणी_

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड

*विक्रमगड* डोल्हारी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिलांसाठी शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन सुदाम खरपडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये खरपडपाडा, धोंदडेपाडा, घाटाळपाडा आणि टोकरेपाडा या पाड्यांमधील एकूण ९५ महिलांनी शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली.

यावेळी महिलांना शेतकरी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच तालुका कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजना आणि त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती देण्यात आली.

शिबिराला तालुका कृषी विभागाचे अधिकारी गावीत उपस्थित होते. त्यांनी महिलांना शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळावा, महिलांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढावा आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर महिलांसाठी उपयुक्त ठरले.

या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना शेतकरी म्हणून आवश्यक कागदपत्रे मिळविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार असून, भविष्यात विविध कृषी योजना, शासकीय सुविधा आणि लाभ मिळविण्यासाठी त्यांना मदत होणार आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें