Majha Gav Majha Shahr
    1. साखरे येथे मोठ्या भक्तीभावात हनुमान जयंती साजरी.

*साखरे येथे मोठ्या भक्तीभावात हनुमान जयंती साजरी*

विक्रमगड माझं गावं माझं शहर

प्रतिनिधी प्रशांत दाव्हाड

*विक्रमगड*:तालुक्यातील साखरे या गावामध्ये मोठ्या भक्तीभावाने हनुमान जयंती साजरी करण्यातआली. श्रीरामाचा दास्य मारुतीराया यांच्या मंदिराला रंगरंगोटी व रोषणाई करण्यात आली होती. सकाळ पासूनच मंदिरामध्ये भक्तगणांची गर्दी बघायला मिळाली.त्यांनी मोठ्या भक्तीभावाने मारुतीरायांच्या मूर्तीला फुलांचा व रुई च्या पानांचा हार अर्पण करून पूजा- अर्चा केली. व संद्याकाळी मारुतीराया यांची आरती व हरिपाठ घेऊन फटाक्यांच्या आतशबाजीत मारुतीरायांची पालखीची मिरवणूक वाजत-गाजत गावभर मिरवण्यात आली.या वेळी बजरंग बली की जय,जय श्रीराम अश्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तसेच मारुतीराया यांच्यावर आधारित विविध भजने गायली गेली. कार्यक्रमाची सांगता हणूमंतस्वारी यांच्या आरतीने करण्यात आली. या वेळी साखरे गावातील सर्व ग्रामस्थ व परिसरातील भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें