अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्याचे NET परीक्षेमध्ये यश…

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* – जिद्द, मेहनत आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर पालघर मधील वाडा तालुक्यातील उंबरदाचापाडा या अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्याने पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) च्या नुकत्याच जाहिर झालेल्या निकालात उल्लेखनीय यश मिळवत जिल्हाची मान उंचावली आहे. शिवध्येय अॅकॅडमी मनोर ( बिरसायत ) येथील विद्यार्थी नितेश अशोक जाधव याने इतिहास विषयामध्ये NET परीक्षा उत्तीर्ण केली असून इतिहास विषयामध्ये SET परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली आहे. तसेच या पुर्वी समाजकार्य (MSW) या विषयामध्ये सुद्धा SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच या अगोदर घेण्यात आलेल्या MH-TET ( २३ नोव्हेंबर २०२५) आणि CTET ( ८ फेब्रुवारी २०२६ ) शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. या अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्याने B.A., D.Ed, B. Ed, CTET, TET, MSW, SET, M.A., SET, NET अशी शैक्षणिक योग्यता हासिल केल्यामुळे त्याचे या भागातून मोठ्याप्रमानावर कौतुक केले जाते.
सद्य परिस्थितीला इतिहासाची चुकिच्या पद्धतिने मोडतोड करुन समाजामध्ये तेढ निर्माण होतांना दिसते. परंतू इतिहासाविषयी योग्य दृष्टिकोण विकसित करुन समाजामध्ये घटनात्मक मुल्य रुजवण्यास मदत होईल. इतिहासिविषयी सकारात्मक दृष्टिकोण निर्माण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. हा जो इतिहासाविषयी सकारात्मक दृष्टिकोण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुम्भोजकर, सहायक प्राध्यापक डॉ. देवकुमार अहिरे आणि आदिवासी एकता मित्र मंडळाचे मनोर संस्थापक व अध्यक्ष श्री. संतोष जनाठे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केला आहे. हा जो इतिहासाविषयी सकारात्मक दृष्टिकोणाचा विद्यार्थ्यांना फायदा होवून उत्तम नागरिक घडण्यास मदत होईल.










