अक्षरधारा फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेला शौचालयची मदत.
*अक्षरधारा फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेला शौचालयची मदत*
विक्रमगड प्रतिनिधी प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* – जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाऊंडेशन
ट्रस्ट मुंबई प्रदीप शर्मा व टिम यांच्याकडून बांधण शाळेतील गरीब व होतकरू तसेच गरजू विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर,अप्रतिम,सुसज्ज असे उत्तम दर्जाचे स्वच्छतागृह बांधून देवून उद्घाटन करण्यात आले.या स्वच्छतागृह बांधून दिल्यामुळे मुलींची गैरसोय दूर होवून आरोग्यास आळा बसणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी अक्षरधारा फाऊंडेशन ट्रस्ट मुंबई संस्था सदस्य प्रदीप शर्मा, दिपक चौहान व टिम तसेच शा.व्या. समिती अध्यक्षा भोईर, मनोज संखे, मुख्याध्यापक जयराम गुरोडा, रविंद्र कामडी, संदेश जाधव, सचिन टोकरे, अक्षय सांबर, निलम थापड, शिक्षक संतोष उमतोल, कॉम्प्युटर शिक्षक विकास तसेच ग्रामस्थ राजू वाडू,तेजस भोईर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





