Majha Gav Majha Shahr

बोईसर:महावितरण प्रशासनाचे मानले आभार

बोईसर पूर्व येथील साईनगर आणि दांडीपाडा परिसरातील नागरिक गेल्या काही काळापासून विजेच्या विविध समस्यांना तोंड देत होते. या समस्येची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पालघर उपतालुका अध्यक्ष श्री. सत्यम मिथिलेश मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ जुलै २०२६ रोजी महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

मनसेच्या या निवेदनाची तत्परतेने दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर परिसरासाठी आवश्यक असलेले सर्व नवीन विद्युत पोल मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे, मागणी केल्यापासून अवघ्या ५ दिवसांच्या आत हे जुने पोल बदलण्याचे तसेच आवश्यक दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.

याशिवाय, यापुढील काळात साईनगर व दांडीपाडा परिसरातील सर्व दुरुस्ती, देखभाल व तांत्रिक कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित लाईनमन व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महावितरण प्रशासनाचे मानले आभार

नागरिकांच्या मूलभूत समस्येचे गांभीर्य ओळखून अवघ्या ५ दिवसांत पोल मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल उपकार्यकारी अभियंता श्री. मुकेश मोरे साहेब यांचे मनसे पक्ष आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

“नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे कटिबद्ध असून, महावितरणच्या तत्परतेमुळे साईनगर व दांडीपाडा परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागत आहे.”

— श्री. सत्यम मिथिलेश मिश्रा (उपतालुका अध्यक्ष, मनसे पालघर)

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें