Majha Gav Majha Shahr

सीड्स बॉल उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागरूकता

मोखाडा / सचिन वझरे सा- माझं गाव माझं शहर (वृत्तसेवा) :

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, घाणवळ (ता. मोखाडा, जि. पालघर) येथे विद्यार्थिनींसाठी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सीड्स बॉल तयार करण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थिनींनी विविध वृक्षांच्या बियाण्यांपासून सीड्स बॉल तयार करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली. पावसाळ्यात हे सीड्स बॉल विविध ठिकाणी विखुरून अधिकाधिक वृक्षांची निर्मिती करण्याचा तसेच भविष्यात मोठ्या प्रमाणावर सीड्स बॉल तयार करून हरित परिसर उभारण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला. उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. सदर उपक्रम शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, घाणवळ यांच्या अधीक्षिका सौ. रेणुका कोडापे व अधीक्षक श्री. कल्पेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें