Majha Gav Majha Shahr

मोखाडा – खोडाळा रस्त्यावरील कोशिमशेत फाट्याजवळील पुलाला डबक्याचे स्वरूप ; पाण्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन अपघाताची शक्यता

 माझं गाव माझं शहर – सचिन वझरे

मोखाडा ग्रामीण -दि. 27 जुलै, मोखाडा – खोडाळा हा रस्ता मुंबईकडे जाण्यासाठी अतिशय कमी वेळ व अंतराचा असल्यामुळे वाहनधारक, प्रवासी अर्थातच या रस्त्याने प्रवास करत असतात.

पावसाळ्यात देवबांध, हिल स्टेशन – सूर्यमाळ, विहीगाव जवळील अशोका धबधबा, मध्य वैतरणा धरण अशी अनेक पर्यटन स्थळे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहेत.त्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील पर्यटक देखील या पर्यटन स्थळांना भेट देत असतात.

पावसाळ्यातील पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक मोखाडा – खोडाळा – कसारा या घाट व वळण मार्गावरील प्रवासा दरम्यान नैसर्गिक सौंदर्य, दाट धुके, डोंगरावरून कोसळणारे असंख्य लहान – मोठे धबधबे यांचा मनमुराद आनंद पर्यटक आणि प्रवासी घेत असतात. शिवाय हा रस्ता राजधानीला जोडणारा असल्याने कायमच रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.

या मार्गावर प्रवास करताना वाहनधारकांना सडकवाडीच्या पुढे आणि कोशिमशेत फाट्याच्या दरम्यान गेल्यावर्षी हा पुल बांधला असून त्यावर योग्य प्रकारे आणि समांतर पातळीवर खडी आणि मुरूमाचा भराव न टाकल्यामुळे तसेच पुलावर डांबरीकरण न केल्यामुळे या पुलाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या डबक्यातून कार – दुचाकी चालक आणि वाहनधरकांना प्रवास करताना पाण्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवासी आणि वाहनचालक विचारत आहेत.

बांधकाम विभागाच्या प्रशासनाने मोखाडा – खोडाळा – कसारा या मार्गावरील अपघात सदृश्य खड्डे बुजवून पुलावरील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात तात्काळ खडी – मुरूम टाकून पुलावर डबके भरून काढावे. अशी मागणी प्रवासी व वाहनचालक सातत्याने करत आहेत.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें