
महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अँण्ड ड्रगीस्टस असोशियाशनच्या वतीने व ह्रदयसम्राट मा. श्री. जगन्नाथजी (आप्पासाहेब) शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्ताने विक्रमगड तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर संपन्न….
.
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड/पालघर:- महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अँण्ड ड्रगीस्टस असोशियाशनच्या वतीने शनिवार दि. २८/१२/२०२४ रोजी झालेल्या कार्यकारणी सभेत मा. श्री. जगन्नाथजी ( आप्पासाहेब) शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात रक्तदानाच्या पवित्र कार्याने साजरा करण्याचा संकल्प संघटनेने घेतलेला होता. केमिस्ट हृदयसम्राट मा. श्री. जगन्नाथजी ( आप्पासाहेब) शिंदे *यांना दि. २९ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण करीत आहेत.या खास प्रसंगाचे औचित्य साधुन आप्पांच्या नेतृत्वाखाली बदललेला केमिस्ट समाजासाठी काहीतरी देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तदान करण्याचा संकल्प करणार आहे.
” रक्तदान हे जीवनदान आहे.” तुमच्या रक्ताच्या थेंबांनी कोणाच तरी आयुष्य वाचू शकत. एका जीवनदायी उपक्रमाने केमिस्ट समाज, समाजाचे देणे लागतो म्हणून समाज सेवेसाठी समर्पित होऊ या! दर सेकंदाला कुठे ना कुठे तरी, कोणाला तरी रक्ताची गरज भासते.
त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात सर्व तालुका, ग्रामीण तसेच शहरी स्तरावर रक्तदान शिबिर शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. राज्य भरातून एकाच दिवशी साधारणत: ७५००० हजार पेक्षा जास्त रक्तदाते या रक्त संकलन उपक्रमात सहभागी व्हावेत असे आवाहन केले होते.
यासाठी विक्रमगड महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड डॣगिस्ट असोशियन यांच्यातर्फे आज सर्व राज्यभर तालुक्यात जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत विक्रमगड येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्येभव्य रक्तदानशिबिर संपन्न झाले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून बऱ्याच रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले जव्हार कुटीर रुग्णालय यांच्या संकलन पेढीने रक्त संकलन केले यावेळी विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशन चे अध्यक्ष योगेश प्रकाश भानुशाली विजय पाटील सचिव विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशन तसेच विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच वाडा, कुडूस अंबाडी येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी प्रफुल पाटील, राजेश चाफेकर, मुकेश पाटील असोसिएशनचे सदस्य, जव्हार ,मोखाडा येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी इमरान जुमाने, मिलिंद चुंबळे व तेथील मेडिकल स्टोअर असोसिएशनचे सदस्य , दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाने, तसेच इच्छुक नागरिकांनी स्वच्छेने रक्तदान करून सहभाग दर्शवला.
जि. प.मराठी शाळा विक्रमगडचे मुख्याध्यापक महाले सर, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम आळशी, विजय भाई पटेल, राहुल वाडेकर, संजय नेवे, समीर आळशी, प्रशांत दाव्हाड आदी पत्रकार वर्ग शिबिरासाठी आवर्जून उपस्थित राहिले.






