Majha Gav Majha Shahr

आजचा विद्यार्थी , उद्याच नागरिक..

घरचा पाया घट्ट केल्या शिवाय भक्कम अशी इमारतीची कल्पना केली जाऊ शकत नाही. नदीच्या तीरावर वाढलेले वृक्ष जास्त काळ टिकले जाऊ शकत नाही तश्याच प्रकारे विचार शून्य पिढी निर्माण करणारा देश कधीच जगाच्या पाठीवर आपली छाप सोडू शकत नाही . आज विश्वगुरू होण्याचा स्वप्न पाहणारा आपला देश इतके सामर्थ्यवान नागरिक देण्यास सक्षम आहे का ? देशाचे नागरिकच देश घडवत असतात. आपला देश आज अनेको संकटांना सामोरे जात आहे ह्या संकटातून देशाला बाहेर काढण्याची जबाबदारी ही ह्या देशाच्या होतकरू पिढीची आहे. सत्य परिस्थिती पाहता आपली नवीन तरुण पिढी आपल्या देशासाठी इतकी जागरूक आहे हे माझे वयक्तिक मत. आजचा विद्यार्थी जो उद्याचा नागरिक होणार आहे हा विद्यार्थी आज थोडे गुण कमी मिळाले की आत्महत्या करतो.
अनेक वेळा वार्ताहर वर व्यसनाधीन झालेले विद्यार्थ्यानं बदल वाचायला मिळते . विचार शून्य झालेले आपले आजचे विद्यार्थी हे सक्षम भारत कसा घडवतील ? दर रोज सकाळी प्रत्येक विद्यार्थी शपथ घेतो की मी माझ्या पालकांचा , गुरूजणांचा व वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन , पण खरच असा तो वागतो का म्हणजे आपण म्हणतो काय आणि करतो काय ह्यातला फरक त्याला समजत नाही हाच विद्यार्थी जेव्हा एखादा पोलिस अधीक्षक बनतो तेव्हा ही तो इमानदार राहण्याची शपथ खातो पण खरंच तो असा वागेल का ? प्रत्येक वाईट चांगल्या बाबींचा बाळकडू आपल्या विद्यार्थी अवस्थेत च मिळते . म्हणून आपल्याला देशाच्या उत्तम उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम असा विद्यार्थी घडवावा लागेल , कारण आजचा विद्यार्थीच उद्याच नागरिक आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें