Majha Gav Majha Shahr

विद्यालय पालघर येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 शालेय जिल्हास्तरीय क्रीडा संपन्न….


विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड


विक्रमगड/ पालघर :- दि.28/01/2025 रोजी स.तु.कदम विद्यालय पालघर येथे झालेल्या शैक्षणिक वर्ष 2024-25 शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प.उच्च प्राथ डोल्हारी बुद्रुक शाळेतील कबड्डी- मुले खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला तर 100 मी.धावणे मुले- मयूर जयवंत ठाकरे द्वितीय क्रमांकाने विजयी झाला आणि म्हणुनच ही शाळा खेळा मध्ये अग्रेसर असल्यामुळे प्रत्येक वर्षाला खेळात प्राविण्य प्राप्त करत आहेत.या क्रीडा स्पर्धेप्रसंगी जि.प.अध्यक्ष मा.श्री.प्रकाश निकम साहेब, विक्रमगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.कासले साहेब, दादडे केंद्राचे केंद्रप्रमुख तथा गट समन्वयक मा.श्री.किरण रोडे साहेब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.विलास चौधरी सर मार्गदर्शक कोच श्री.संतोष गणपत उमतोल सर,मेघा ठाकरे,श्री.विष्णु उमतोल श्री.प्रशांत महाले सर श्री.विनोद पानतले, शा.व्या.सदस किसन खरपडे,मगन खरपडे माजी उपसरपंच श्री.एकनाथ हरपाले,दिपक ठाकरे व असंख्य ग्रामस्थ हितचिंतक उपस्थित होते.
शाळेतील या विजेत्या मुलांचे पं.स.सभापती मा.श्री.कनोजे साहेब, उपसभापती मा.श्री.भोईर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.पाचमासे साहेब, सरपंच विलास गहला,उपसरपंच महेश खरपडे,ग्रामस्थ यांनी या मुलांचे अभिनंदन केले. एकंदरीत संपूर्ण विक्रमगड तालुक्यातून या गुणी खेळाडू मुलांचे गोड कौतुक केले जात आहे.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें