Majha Gav Majha Shahr

ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी येथे महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ संपन्न.

ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी येथे महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ संपन्न.

कासटवाडी (ता. जव्हार, जि. पालघर): कासटवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या पुढाकाराने जाधवपाडा येथे भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जवळपास २५० महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी एकत्र येत परंपरागत हळदीकुंकवाचा सण साजरा केला आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाला कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत, उपसरपंच त्रिंबक रावते, सदस्य कुणाल रावते, नितीन चौधरी, शंकर इल्हात तसेच कल्याणी राऊत, मोनिका खिरारी, सुचिता होळकर आणि गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण व सामाजिक एकत्रतेसाठी असा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें