
इंडुरन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024-25 मध्ये सागर स्केटिंग अकॅडेमीच्या स्केटर्सची उल्लेखनीय कामगिरी
टिटवाळा – रामदास गाडर
इंडूरन्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित, खोपोली येथे 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी दिवसा आणि रात्री प्रकाशझोतात स्पेशल स्केटिंग रिंकवर इंडुरन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024-25 संपन्न झाली. या स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये स्पीड क्वाड, स्पीड इनलाईन, रिकेशनल स्केटर्स महाराष्ट्र, गोवा,गुजरात,तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश इ.राज्यांमधून दिव्यांग स्केटर्ससह जवळपास 800 च्यावर स्केटर्स सहभागी झाले होते.
या स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये सागर स्केटिंग अकॅडेमी- टिटवाळा शाखेचे स्केटर्सनी 14 वर्षे वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना कु दक्षतनया गाडर हिने स्पीड इनलाईनमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल्स तर यश भिवसने याने स्पीड क्वाडमध्ये 3 ब्रॉन्झ मेडल्स पटकावले आहेत.
तसेच सागर स्केटिंग अकॅडमीच्या कल्याण शाखेतील स्केटर्स कु. रुद्र भोसले याने 14 वर्षे वयोगटात एक गोल्ड मेडल आणि दोन ब्रॉन्झ मेडल्स तर कु.अर्णव श्रीवास्तव याने 6 वर्षे वयोगटात एक ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत.हे सर्व स्केटर्स फिलिपाईन्स येथे होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप करिता भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
हे सर्व स्केटर्स सागर स्केटिंग अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक – श्री. कुलदीप सागर आणि दिपक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगची तंत्रे आत्मसात स्केटिंग रिंकवर सराव करत आहेत.






