
MD ड्रग्स बनवणारे रॅकेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचे ड्रग्स जप्त! पालघर पोलिसांची मोठी कारवाई
बोईसर खुशाल जैन:
पोलिस अधीक्षक कार्यालय, पालघर यांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. अंमली पदार्थ MD (मेफेड्रॉन) बनवणारे आणि त्याची विक्री करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या कारवाईत 2 कोटी 41 लाख 74 हजार 902 रुपये किमतीचे ड्रग्स आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नशामुक्ती अभियानाला यश:
महाराष्ट्र राज्यात नशामुक्ती अभियान सुरू आहे, त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, विशेष पोलिस महानिरीक्षक, आणि पोलिस अधीक्षक यांनी अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा आणि उत्पादन करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बोईसर काटकरपाडा येथील एका इमारतीत छापा टाकण्यात आला. यामध्ये अमन नईम मुराद (वय 29) नावाचा व्यक्ती MD ड्रग्स बनवताना आढळला. त्याच्याकडून 1208 ग्रॅम मेफेड्रॉन (ज्याची किंमत 2 कोटी 41 लाख 60 हजार रुपये आहे) आणि 14 हजार 902 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी अमन मुराद याला अटक करण्यात आली असून त्याला 11 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस कोठडीत असताना आरोपीने भाड्याने रूम घेऊन तिथे ड्रग्स बनवत असल्याची माहिती दिली. त्याने ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे रसायन विविध ठिकाणांहून आणल्याचेही कबूल केले आहे.
या मोठ्या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री आणि उत्पादनावर मोठा अंकुश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपींची नावे आणि पत्ता:
१) कलीम शाकीर खान, वय २४ वर्षे, रा. आशिर्वाद मंजिल बिल्डींग, रूम नंबर २०१, काननगो इस्टेट, दिपक हॉस्पिटल जवळ, मिरारोड (पूर्व), ता.जि. ठाणे. मूळ रा. गांव-उतरोला, जि. गौंडा, उत्तरप्रदेश.
२) अमन आरिफ सय्यद, वय २५ वर्षे, रा. रूम नंबर ००१, तळमजला, डिप्लोमसी बिल्डींग, काननगो इस्टेट, दिपक हॉस्पिटल जवळ, मिरारोड (पूर्व), ता.जि. ठाणे.
३) सनी राजकुमार सिंग, वय २९ वर्षे, रा. रूम नंबर ४०१, ओ विंग, न्यू पंचवटी अपार्टमेंट समोर, वोल्ड पेट्रोल पंप, मिरा-भाईंदर रोड, शिवा गार्डन जवळ, मिरारोड, ता.जि. ठाणे. मूळ रा. लोगनाथ चौक, प्रयागराज, उत्तरप्रदेश.
पोलिसांनी आरोपींकडून मॅफेड्रॉन नावाचे ड्रग्स जप्त केले आहेत. आरोपी हे ड्रग्स तयार करून विक्री करण्यासाठी त्यांचे साथीदार १) कलीम शाकीर खान, वय २४ वर्षे, २) अमन आरिफ सय्यद, वय २५ वर्षे, ३) सनी राजकुमार सिंग, वय २९ वर्षे यांना देत असल्याची माहिती मिळाली आहे. नमूद ०३ आरोपींना दि. ०९/०२/२०२५ रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई मा. श्री. बाळासाहेब पाटील साो. पोलीस अधीक्षक पालघर, मा. श्री. विनायक नरळे साो. अपर पोलीस अधीक्षक पालघर व मा. श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनानुसार पोनि/शिरीष पवार, बोईसर पो.ठाणे, पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर, सपोनि/सतिष आस्वर, सपोनि/अनिल व्हटकर, पोउनि/गणपत सुळे, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/रविंद्र वानखेडे, श्रे. पोउनि/राजेश वाघ, श्रे. पोउनि/सुनिल नलावडे, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय धांगडा, पोना/कल्याण केंगार, पोअमं/वैभव जामदार, पोअमं/प्रशांत निकम, नेम. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व पथकाने केलेली आहे.






