Majha Gav Majha Shahr

सेवा सहयोग फाउंडेशन बोईसर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये नूतन विद्यामंदिर उमरोळी शाळेचा द्वितीय क्रमांक.

सेवा सहयोग फाउंडेशन बोईसर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये नूतन विद्यामंदिर उमरोळी शाळेचा द्वितीय क्रमांक

. माझं गावं माझं शहर वृत्तसेवा

.पालघर. ग्रामीण शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यामंदिर, उमरोळी शाळेला सेवा सहयोग फाउंडेशन बोईसर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोगाचे नाव- “मॉस्किटो मशीन” द्वितीय क्रमांक कु .धनश्री कुंदन पटेल इयत्ता सहावी ( अ) मॉस्किटो मशीन हे कमी खर्चात आणि पर्यावरण पूरक असुन या विद्यार्थिनी बनवलेले आहे. यामध्ये ब्लू लाईट मुळे मच्छर आकर्षित होतात आणि फॅनच्या साह्याने खाली खेचले जाऊन मरतात ,त्याच्यामुळे कुठलाच प्रकारचे प्रदूषण होत नाही. मच्छर मरतात आणि आपलं घर हे सुरक्षित राहते .डेंगू मलेरिया, ताप , चिकनगुनिया डासांपासून सुटका मिळते . या प्रयोगासाठी मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका कुमारी नीलिमा करपट मॅडम. श्री .हेमंत घाटाळ सर. मुख्याध्यापक श्री .संजय कमळकर सर विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच तिचे वडिल श्री. कुंदन पटेल यांचे प्रोत्साहन मिळाले .शालेय स्तरावर तिचे ग्रामीण शिक्षण संस्था संचालित व शालेय शिक्षण समिती कडून व पालक वर्गाकडून , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे .

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें