Majha Gav Majha Shahr

साखरे येथे अखाती सण मोठ्या थाटात साजरा. आखाती सण 

साखरे येथे अखाती सण मोठ्या थाटात साजरा. आखाती सण साखरे येथे अखाती सण मोठ्या थाटात साजरा. आखाती सण 

 

*अखाती सणाला आमदार हरिश्चंद्रजी भोये व हेमंतजी सवरा यांची साखरे येथे उपस्थिती.*

विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड

*विक्रमगड :* तालुक्यातील साखरे येथे अखाती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.निसर्गाशी नाळ जोडणारा हा सणआदिवासी बांधव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात.शेतावरील राबणीचे कामेआटपून पाऊस पडण्याच्या अगोदरआखातीच्या आठ दिवस आधी शेतातली माती आणून ती टोपलीत (दुरडी) ग्रामीण भागामध्ये त्याला भरनुटी सुद्धा म्हणतात.त्या मध्ये ती माती घेऊन त्यामध्ये निसर्गाची पूजा करून पेरणी केली जाते.या पेरणीमध्ये मका,तूर,उडीद नागली,वरई,भात इत्यादी बियाणे पेरले जाते.याच्या माध्यमातून अनुभवी आदिवासी बांधव माती परीक्षण व बीज परीक्षण करीतअसतात.याच्या माध्यमातून या वर्षी पीक कसे येईल व पाऊसपाणी कसा होईल याचा अंदाज लावला जातो.ज्या टोपलीत हे धान्य उगवले जाते. त्याला गौरी असे म्हणतात. ही परंपरा खूप पारंपरिक असून ती आजतागायत साखरेकरांनी व विक्रमगड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी टिकवून ठेवलीआहे.अखातीच्या दिवशी गौरीची घरोघरी मोठ्या भक्ती भावाने पूजा केली जाते तसेच पूर्वजनांना नैवेद्य दाखवून त्यांचे स्मरण केले जाते.व निसर्गाची पूजा केली जाते हा सण निसर्गमय वातावरणामध्ये पार पाडला जातो.या सणासाठी बाहेर कामासाठी गेलेली माणसे आवर्जून उपस्थित होत असतात.धान्य उगवे पर्यंत आठ दिवस गावातील महिला रात्री एकत्र येत पारंपरिक व निसर्गमय गाणे गातअसतात. या गाण्यांच्या माध्यमातून आदिवासी व निसर्ग यांच्यातील ऋणानुबंध घट होण्यास मदत होतअसते निसर्गासी व आदिवासी यांच्यातील समंध काय आहे ते या सणाच्या माध्यमातून समजते.साखरे येथे सुद्धा आमदार हरिश्चंद्रजी भोये व खासदार हेमंतजी सवरा यांच्या उपस्थिती संबळ च्या तालावर भव्य दिव्य अशी वाजता गाजत मिरवणूक काढण्यातआली.ही मिरवणूनक रात्री उशिरा पर्यंत गावभर मिरवण्यात आली.शेवटी या आदिवासी बांधवांच्या परंपरेनुसार गौराईचे विसर्जन गावातील नदीवर करण्यात आले.या वेळी विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये व पालघर लोकसभा खासदार हेमंतजी सवरा व त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच साखरे ग्रामपंचायतचे सरपंच आणि गावातील ग्रामस्थ व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें