अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान .

माझं गावं माझं शहर वृत्तसेवा सचिन वझरे
जव्हार : दि. ६जुलै, रोजी आदिवासी वारली समाज मंडळ – पालघर व अखिल भारतीय वारली समाजाच्या वतीने “अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवी याचा घिवंड्यातील ( पिंपळाचापाडा ) ता. जव्हार येथे त्याच्या राहत्या घरी भेट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच त्याचे विशेष अभिनंदन करून पुढील त्याला पुढील भावी त्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा देण्यात आल्या.
युवा धावपट्टू विशाल याने पुणे मान्सून स्टेडियम रनमध्ये 100 कि.मी.ची यशस्वी धाव घेवून 07 तास 09 मिनिटे आणि 44 सेकंद अशी कामगिरीतील उत्कृष्ट वेळ नोंदवत गोल्ड मेडल पटकावले होते. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे जव्हार तालुका, पालघर जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे देशभरात नाव उंचावले आहे. त्यामुळे “अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीचा याचा आदिवासी समाजाला प्रचंड अभिमान वाटला. या पार्श्वभूमीवर ‘आदिवासी वारली समाज मंडळ – पालघर ‘ व ‘ अखिल भारतीय वारली समाज ‘ यांच्या वतीने विशाल यास शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सन्मान समारंभा प्रसंगी घिवंडा ग्रा पं.सरपंच सौ.फुफाणे, ग्रा. प सदस्य श्री.शिंगडे समाजमंडळाचे जिल्हाध्यक्ष – भाऊ नावळे, उपाध्यक्ष – श्रावण वातास, पत्रकार – मकरंद बात्रे, शिक्षक – भालचंद्र धनगरे, हितेश मोहोंडकर, दशरथ वळवी, रवि बुधर पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते -प्रकाश बाबल्या पाटकर, अशोक शिंगाडा, श्री.सोनावणे, माजी सरपंच – शिवराम बुधर,विजय वाजे, माजी ग्रामपंचायत सदस्य – शिवराम बरफ उपस्थित होते तसेच समाज कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.










