Majha Gav Majha Shahr

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य वाटप.

 

आज जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आदरणीय मा.श्री.प्रदिप शर्मा साहेब यांच्या हस्ते व टिम मार्फत शैक्षणिक शाहित्य वह्या, पेन, पेंशिल, शापणर, खोरबर, बिस्किटे व इतर वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच बांधणकर आदरणीय मा.श्री.अजित संखे साहेब, प्रविण दादा संखे साहेब, मनोजदादा संखे साहेब व संखे मॅडम यांनी प्रजासत्ताक दिनी दिलेला शब्द पाळून मुलांना बसण्यासाठी उत्तम दर्जाच्या सतरंजी (चटई )चे वाटप करून आमच्या गोरगरीब होतकरू व गरजू विध्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.या शैक्षणिक शाहित्याचा मुलांच्या शिक्षणासाठी निश्चितपणे उपयोग होईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री.जयराम गुरोडा सर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बांधण शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मा.श्री.जयराम गुरोडा सर, सहशिक्षक श्री.रविंद्र कामडी सर,श्री.सहशिक्षक संदेश जाधव सर,सहशिक्षक श्री.संतोष उमतोल सर,पदवीधर शिक्षिका सौ.निलम थापड मॅडम, सहशिक्षक श्री.सचिन टोकरे सर,पदवीधर शिक्षक श्री.अक्षय सांबर सर व ग्रामस्थ उपस्थित होते.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें