Majha Gav Majha Shahr

वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदन यांच्या हस्ते आसे प्रा.आ. केंद्रात वृक्षारोपण

मोखाडा / सचिन वझरे माझं गाव माझं शहर’ वृत्तसेवा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रा. आ. केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमात ‘माझं गाव माझं शहर’ वृत्तसेवेचे पत्रकार – सचिन वझरे उपस्थित होते. तसेच डॉ. खान, आरोग्य सहाय्यक – नामदेव भोये, सिस्टर – अश्विनी मौळे, रूपाली पडघे, शिपाई – वारघडे मामा, गंगाधर भोईर आणि १०८ रुग्णवाहिकेचे चालक – रमेश पाघारी यांनीही वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी डॉ. नंदन यांनी वृक्षांचे पर्यावरणीय व मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करत प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. झाडांमुळे शुद्ध हवा, पावसाचे संतुलन, तापमान नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.

उपस्थितांनी लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन अधिकाधिक नागरिकांनी वृक्षारोपणात सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें